नांदेड : महाविहार बावरीनगर, दाभड ता.अर्धापूर जि.नांदेड येथे दि.06व07 जानेवारी2023 या द्विदिवसीय 36 व्या धम्म परिषदेचे आयोजन डाॅ.एस पी गायकवाड, संयोजक तथा कार्यकारी अध्यक्ष तीर्थक्षेत्र विकास सुकाणू समिती, नांदेड व भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू.भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेत पौष पौर्णिमा रोजी धम्म परिषद संपन्न होत आहे.
बौद्ध धम्माच्या गौरवशाली इतिहास व बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याची प्रेरणा मनुष्यास मिळावी या करिता विश्व स्तरावर धम्म जागृती केली जाते.
या परिषदेचे उद्घाटन पू. भदंत अतुरलिये रतन थेरा (विद्यमान खासदार श्रीलंका)हे करतील, ब्रम्हदेश चे पू. भदंत मेधानंद थेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होईल.
धम्म परिषदेत प्रमुख पाहुणे
पू.भिक्खू चंदबोधी महाथेरो-इंग्लड ,
पू.भिक्खू कुरूज्ञागल इंदरतन थेरो-श्रीलंका
पू.भिक्खू अशिनकोमल थेरो ब्रम्हदेश
पू.भिक्खू नराॅग थायलंड
पू.भिक्खू नोट थायलंड धम्मदेसना देतील.
दि.07 जानेवारी ला वधू-वर परिचय मेळावा व मंगल परिणय, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम होणार आहेत.
धम्म परिषदेत देश-विदेशातील पू.भिक्खू संघ उपस्थित राहून धम्म देसना देतील, मराठवाडय़ातील धम्म अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मप्रबोधनाचा लाभ घ्यावा असे संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment