औरंगाबाद : जानेवारी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गौरवार्थ मिलिंद दिनदर्शिकेचे भीमाकोरेगाव विजयरण स्तंभ येथे सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब ,साहिल आंबेडकर साहेब,अमन आंबेडकर साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संजीव बौद्धनकर, विवेक बनसोडे,युवराज बनसोडे,सागर डबरासे,सरपंच किरण घोंगडे,विजयरण स्तंभ सेवा समितीचे सर्जेराव वाघमारे, आशिष गाडे, विशाल म्हस्के व संपादक सचिन निकम यांची उपस्थिती होती.
मिलिंद प्रकाशन च्या वतीने प्रकाशित या दिनदर्शिकेत मुक्ती कोण पथे ? हे महामानव डॉ.आंबेडकरांचे अत्यंत गाजलेले संपूर्ण भाषण,पीपल्स एज्युकेशन सोसायटीची अधिकाधिक माहिती,सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा विस्तृत जीवनपट व बुद्धधम्म, बाबासाहेबांचे महत्वाची भाषणे व इतर भरपूर माहिती संपादित करण्यात आलेली आहे.
मिलिंद प्रकाशन च्या वतीने ही दिनदर्शिका औरंगाबाद येथून प्रकाशित केली आहे.
No comments:
Post a Comment