जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनासाठी उद्योजक, शेतकरी व बँक प्रतिनिधीची बैठक संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 January 2023

जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनासाठी उद्योजक, शेतकरी व बँक प्रतिनिधीची बैठक संपन्न

 औरंगाबाद, दिनांक 31  : उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी (मैत्री) हे महाराष्ट्र उद्योग, व्यापार गुंतवणुक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. टाटा उद्योगासमुहाच्या मदतीने कृषी, उद्योग आणि सहकार तसेच विविध व्यवसाय गटांचे योगदान व अडचणी यावर अभ्यास करुन शासनास सल्ला  दिला जाणार आहे. वित्तीय नियोजन करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. आज टाटा स्ट्रॅजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीने उद्योजक, बँक प्रतिनिधी, शेतकरी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या समिती विषयी माहिती सांगितली. याचा फायदा शेतकरी, लघुउद्योजक व विविध कृषी उत्पादक शेतकरी गटाचे प्रतिनिधी यांना होणार असल्याचेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. 

 टाटा स्ट्रॅजिक मॅनेजमेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश साठे, सदस्य राजमयुर शर्मा, स्नेह शहा तसेच देवगिरी नागरी सहाकारी बँकेचे अध्यक्ष किशोर ‍शितोळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ, दुग्ध उत्पादक संघाचे कारभारी मनगटे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रशांत सदाफुले, अजंठा अर्बन सहाकारी बँकेचे गणेश चौधरी व संदेश वाघ, यांच्यासह विविध दुध उत्पादन संघाचे प्रतिनिधी, कुक्क्टपालक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती.  


No comments:

Post a Comment

Pages