काँग्रेसच्या राज्य आदिवासी कार्यकारिणीतील उपाध्यक्षपदी नारायणराव सिडाम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 January 2023

काँग्रेसच्या राज्य आदिवासी कार्यकारिणीतील उपाध्यक्षपदी नारायणराव सिडाम

किनवट. दि.31 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ‘उपाध्यक्ष’ पदावर येथील आदिवासी नेते नारायणराव सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती संदर्भातील  पत्र  महाराष्ट्र प्रदेश  आदिवासी काँग्रसेचे अध्यक्ष तथा माजी आमदार  डॉ. नामदेव उसेंडी यांनी नुकतेच पाठविले आहे.


  या नियुक्ती  पत्रात नमूद केले की, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या मान्यतेने आपणास उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले असून, काँग्रेसची विचारधारा व गांधी घराण्याचे नेतृत्व हेच आदिवासींना न्याय देऊ शकतात. त्या अनुषंगाने प्रत्येक आदिवासीला काँग्रेस पक्षाच्या संघटनेशी जोडण्याची नैतिक जबाबदारी आपली असल्यामुळे, आपण हे दिलेले कार्य निष्ठेने पूर्ण करावे. काँग्रेस पक्ष मजबूत झाल्यास आदिवासी सुरक्षित राहतील. करिता राज्यातील काँग्रेस पक्षाच्या इतर संघटनेसोबत समन्वय साधून आदिवासी काँग्रेसचे कार्य वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.


      सिडाम हे गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असून, यापूर्वी काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यासह विविध पदांवर  कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊनत्यांची सदर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सिडाम हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, के.सी पाडवी, पद्माकर वळवी ,आमदार सहसाराम कोरोटे मा.आमदार उत्तमराव गेडाम, कांग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages