किनवट ,ता .३१(बातमीदार ): शालेय पोषण आहार कामगारांचे आंदोलन आज(ता .३१)गट शिक्षणाधिकारी कार्यालयावर काॅ.अर्जुन आडे,काॅ.गंगाधर गायकवाड,काॅ.जनार्दन काळे यांच्या नेतृत्वात संपन्न झाले.
शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ करुण किमान वेतन देण्यात यावे, विना तक्रार कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये,भाजीपाला,इंधन,तेलाचे बिल थेट कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे,शालेय पोषण आहार कामगारांना आहारा ऐवजी इतर कामे लाऊ नये,मानधन, इंधन,भाजीपाला,तेलाचे बिल दर महिण्याला वेळेत अदा करण्यात यावे, कामगार विरोधी कायदे वापस घेण्यात यावे, इत्यादि मागण्या यावेळी आंदोलनच्या वतीने करण्यात आल्या. १५०० रूपयांच्या अंत्यंत तुटपुंज्या मानधनावर शालेय आहार कामगार काम करीत असून कामगारांना कामाचा योग्य मोबदला मिळावा, कामगारांना किमान वेतन द्यावे, असे मत यावेळी आंदोलनाला संबोधित करत असतांना सीटु चे नेते काॅ.जनार्दन काळे यांनी व्यक्त केले.कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करुन किमान जगण्यापुरते वेतन द्या, अशी अग्रही मागणी सिटु चे जिल्हा सचिव काॅ.गंगाधर गायकवाड यांनी केली.आंदोलनास किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी पांठिबा दिला.
आंदोलनात दिलीप कोडापे,दत्ता सहाने,सोनाबाई भांगे,बंडु चव्हाण, मडावीबाई आदि शालेय पोषण आहार कामगार उपस्थित होते.प्रशासनाच्या वतीने मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन लेखी देण्यात आले.
कामगार एकजूट झिंदाबाद,कामगारांना किमान वेतन लागू करा, कामगार विरोधी कायदे वापस घ्या, अशा गगनभेदी घोषनांणी आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
No comments:
Post a Comment