निबंध, सुंदर हस्ताक्षर,ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 January 2023

निबंध, सुंदर हस्ताक्षर,ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम संपन्न

किनवट,ता.३१(बातमीदार): बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने निबंध, सुंदर हस्ताक्षर,ग्रंथप्रदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

'आधुनिक तंत्रज्ञानात मराठी भाषेच्या वापरातील शब्द' या विषयावर निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सहभागी विद्यार्थी व विजेते स्पर्धक यांचे पुष्प गुच्छे देऊन सत्कार प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर यांनी केला.याप्रसंगी भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी ,आत्मचरित्र, आत्मकथन, नाटक, काव्यसंग्रह विविध ग्रंथ विद्यार्थ्यांनी पाहिले, वाचले.या ग्रंथप्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथाची माहिती घेतली.याप्रसंगी डॉ. शुंभागी दिवे, प्रा. आम्रपाली हटकर, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड, प्रा. गजानन सोनोने, महेंद्र नरवाडे, स्वप्नील भालेराव, प्रा.दयानंद वाघमारे, डॉ. विजया खामनकर, यांची उपस्थिती होती.

ग्रंथाचे महत्त्व समजावून सांगताना मराठी विभागप्रमुख डॉ. पंजाब शेरे यांनी ग्रंथ हेच गुरु आहेत.ग्रंथालयात येऊन विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचावे,वाचन वाढवावे व लेखन करावे ,असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रल्हाद जाधव यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Pages