किनवट ,तालुका प्रतिनिधी :
प्रगत महाराष्ट्र मंडळ संचालित मूकबधिर निवासी मूकबधिर विद्यालय अय्यप्पा नगर किनवट येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
प्रथमतः आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिनंदन करण्यात आले .
तदनंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी.आंबेगावे ,जिल्हाध्यक्ष मा. संजीव कुमार गायकवाड व मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नसीर तगाले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते नागनाथ भालेराव, सहशिक्षक विठ्ठल वडजे, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, ता.सचिव राजेश पाटील,तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके,सदस्य शेख खय्युम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
निवासी मूकबधिर विद्यालयात कार्यक्रमासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदावनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment