जगमें बुद्ध का नाम है,यही भारत की शान है..! धम्मध्वज गौरव रॅलीत घुमला आवाज पहिल्यांदाच जल्लोषात साजरा झाला विश्व धम्मध्वज दिन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 8 January 2023

जगमें बुद्ध का नाम है,यही भारत की शान है..! धम्मध्वज गौरव रॅलीत घुमला आवाज पहिल्यांदाच जल्लोषात साजरा झाला विश्व धम्मध्वज दिन

औरंगाबाद दि.८ बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या १०० फूट लांब व ४ रुंद धम्मध्वजाची विद्यापीठ गेट ते धम्मभूमी बौद्धलेणी अशी भव्य गौरव रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ह्या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.


ज्या श्रीलंका देशात धम्मध्वजाची निर्मिती झाली त्या श्रीलंकेतून आलेल्या भन्ते पालिथा,भन्ते बलगोंडा कश्यप,भन्ते श्रीनिवासा व भिक्खू संघाच्या बुद्धवंदनेने रॅली ची सुरवात करण्यात आली.


रॅलीत जगमें बुद्ध का नाम है,यही भारत की शान है..! हा एकच आवाज घुमला. १०० फूट लांब धम्मध्वज,धम्मरथावरील शुभ्र बुद्ध मूर्ती,भव्य धम्मचक्र,भारतीय संविधानाची प्रतिकृती हे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल , महास्थविर गुणानंद , सुमंगल , बौध्द विव्दान जी . आर. डिसिल्वा आदींनी मिळून निळा , पिवळा , लाल , पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ' विश्व बौध्द ध्वजा ' ची निर्मिती केली संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे , या विचाराने  कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली. याला पाली भाषेत ' षडरोशनी ध्वज ' किंवा ' धम्म ध्वज ' असे म्हणतात .


 त्याला आज रोजी १४३ वर्ष पूर्ण झाल्याने धम्मध्वज गौरव रॅली काढून हा दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.


यावेळी विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पंचरंगी फुगे सोडून धम्मध्वज दिनाचा जल्लोष करण्यात आला व धम्मभूमी बौद्धलेणी येथे सामूहिक बौद्ध वंदना घेऊन रॅली चा समारोप करण्यात आला.


यावेळी भंते नागसेन बोधी,डॉ.प्रमोद दुथडे,डॉ.शंकर अंभोरे,डॉ.अनिल पांडे,विलास जगताप,दौलतराव मोरे,साऊथ स्टेशन बुद्ध फॉर्म चे सचिव प्रा.प्रियानंद आगळे,इंद्रकुमार जेवरीकर,डॉ.अविनाश सोनवणे,सुमेध मेश्राम,संतोष मोकळे,प्रा.सिद्धोधन मोरे,डॉ.संदिप जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती. 


तर आयोजक सचिन निकम,अविनाश कांबळे,प्रा.प्रबोधन बनसोडे,गुणरत्न सोनवणे,राहुल वडमारे,ऍड.हेमंत मोरे,ऍड.रवी दाभाडे,प्रा.किशोर वाघ, प्रवीण हिवराळे,कुणाल भालेराव,अतुल कांबळे,सनी देहाडे, राष्ट्रपाल गवई, संदिप अहिरे,रोहित वाहुळ,ऍड.अमोल घोबले,अमित घनघाव,कुणाल राऊत,अमित दांडगे,विकास रोडे,चिरंजीव मनवर,विश्वजित गायकवाड,शैलेंद्र म्हस्के,दिनेश गवळे,दीपक जाधव,राहुल कानडे,सागर ठाकूर, पवन पवार,मनीष नरवडे, भूषण खोडके, अनिकेत प्रधान, सचिन शिंगाडे,सचिन जगधने,अक्ष मगर,अभिमयू गडवे,मोहन खंडागळे,अविनाश जगधने,स्वप्नील शिरसाठ,प्रवीण गायकवाड,सतीश शिंदे,प्रशांत बोरडे,नारायण खरात,भीमराव वाघमारे,सिद्धार्थ मोरे,स्वप्नील जगताप,आकाश जाधव,सचिन ठोके,ऋषीकेश म्हस्के,बळीराम चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Pages