किनवट : किनवट पासून जवळच असलेल्या मौजे अंबाडी येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महान संत चिमणाजी महाराज यांची ८६ वी पुण्यतीथी तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन दि.२२फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात येणार असून ६ फेब्रुवारी रोजी सांची बौद्ध विहार येथील बैठकीत आयु.सतिश गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महान संत चिमणाजी महाराज यांची ८६ वि पुण्यतिथी तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन 22 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले असून या नियोजनार्थ भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष आयु.गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी गठीत करण्यात आली.बौद्ध मेळाव्याचे अध्यक्षपदी सतिष गिरीधर पाटील, सचिवपदी आयु. अभय मनोज भवरे तर उपाध्यक्ष आयु. विशाल सुदामराव हलवले,सहसचिव आयु. सुरेन्द्र घुले,कोषाध्यक्ष आयु.कपिल हलवले,उमेश भवरे,सहकोषाध्यक्ष आयु.संजय हंमरुजी भवरे,संघटक म्हणून आयु.प्रेमानंद कानिंदे,सहसंघटक आयु.उल्हास रामा फुसाटे, आयु.सुशीलकुमार कानिंदे तर सल्लागार म्हणून आयु.रमेश हलवले,देविदास भवरे व सह सल्लागार आयु.राजहंस भवरे,अजय भगत,राष्ट्रदिप कयापाक,अमित भवरे,दादाराव नगराळे,अशोक ठमके व एकनाथ कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment