नांदेड दि : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील 2022 ची पीएच.डी प्रवेशची आरएसी संपन्न झाली असून विद्यापीठाने कोर्सवर्क पास झाल्यानंतर आरआरसी घेण्याचे घोषित केले, यामुळे संशोधनासाठी लागणारा कालावधी व पीएच.डी अभ्यासक्रमाचा कालावधी वाढत आहे. तसेच युजीसी च्या 2016 नियमानुसार एम.फील साठी कोर्सवर्क पास होणे आधी गरजेचे आहे. पण ही अट पीएच.डी ला लागू होत नाही. कोर्सवर्क हे पीएच.डी पदवीसाठी अनिवार्य आहे, जे की पीएच.डी प्रवेशासाठी अनिवार्य नाही. त्यामुळे कोर्सवर्कच्या च्या आधी 2022 च्या विद्यार्थ्यांची आरआरसी आयोजित करण्यात यावी. यासाठी नॅशनल एसी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) या व इतर मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना निवेदन दिले आहे.
तसेंच पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने बायोमॅट्रीक अनिवार्य केले पण त्या संदर्भातील कुठल्याही नियमाची सुस्पष्टता व नियमावली बनविणयात आली नाही, ज्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक संशोधन केंद्राच्या व विद्यापीठ परिक्षेत्राच्या बाहेर आहेत. आशा संशोधक विद्यार्थ्यांसाठी नियमावली बनवली नाही तसेच जे संशोधन केंद्रावर ज्याचे संशोधकाचे मार्गदर्शक आहेत त्या संशोधन केंद्रावर संशोधक विद्यार्थ्यांसाठी संगणक, टेबल, खुर्च्या, इंटरनेट सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तीन संशोधकांमध्ये एक प्रिंटर अनिवार्य आहे. ही नियमावली फेलोशिप धारक संशोधकांसाठी यूजीसी ने बनवलेल्या नियमावलीत आहेत, तसेच महाराष्ट्रातील इतर विद्यापीठात, केंद्रीय विद्यापीठात एम. फिल चा अभ्यासक्रम सुरू असून मागच्या तीन वर्षापासून विद्यार्थ्यांची वारंवार मागणी असून सुद्धा आपण एम.फिल अभ्यासक्रम सुरू केले नाही. प्राध्यापक भरती प्रक्रियेत एम.फिल अभ्यासक्रमाचे API मध्ये दहा गुण ग्राह्य धरले जातात, तसेच यूजीसी व राज्यातील विविध संस्था एम.फील संशोधक विद्यार्थ्यांना फिलोशीप देत आहे. त्यामुळे एम. फिल अभ्यासक्रम विद्यापीठाने लवकरात लवकर सुरू करावा.मागच्या अनेक वर्षापासून द्वितीय गुणपत्रिकेला डुप्लिकेट मेमो असा शिक्कामोर्तबचा मार्कमेमो वितरित करत आहेत, जेणे करून पुढे चालून विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यासाठी आपण मार्क मेमोला द्वितीय प्रत किंवा सेकंड कॉपी असा शिक्कामोर्तब करावा. अशा प्रमुख मागण्या घेऊन कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी विद्यार्थी नेते डॉ. हर्षवर्धन दवणे, प्रा. सतीश वागरे, डॉ. प्रवीणकुमार सावंत, जयवर्धन गच्चे, आदिनाथ डोपेवाड यांची उपस्थिती होती, तसेच वरील मागण्या दोन आठवड्यात मान्य न झाल्यास संशोधक विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा विद्यापीठावर काढण्यात येईल असा ही इशारा निवेदनामार्फत मा. कुलगुरूंना देण्यात आला आहे.
एकूण प्रमुख मागण्या
1) 2022 मध्ये ज्या पीएचडीच्या विद्याथ्र्यांची आरएसी घेण्यात आली त्या विद्यार्थ्यांची कोर्सवर्क आधी आरआरसी घेण्यात यावी
2) बायोमेट्रिक पद्धती संदर्भात सविस्तर नियमावली व मार्गदर्शन फेलोशिप धारक विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात यावी
3) फेलोशिप धारक विद्यार्थ्यांना यूजीसी च्या नियमानुसार सुई सुविधा संशोधन केंद्रात पुरवण्यात याव्यात
4) आपल्या विद्यापीठात एम.फील अभ्यासक्रम त्वरित सुरू करण्यात यावा
5) मार्क मेमोच्या द्वितीय प्रतिला डुप्लिकेट कॉपी न म्हणता सेकंड कॉपी म्हणून मार्क मेमो देण्यात यावा
अश्या विविध मागण्या नसोसवायएफच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment