आंबेडकर भवन व मागासवर्गीय वसतिगृहा साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 18 January 2023

आंबेडकर भवन व मागासवर्गीय वसतिगृहा साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

किनवट,दि.१८ : समाज कल्याण विभागा अंतर्गत अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व मागासवर्गीय वसतिगृहा साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी,या मागणीचे निवेदन आज(दि.१८) नगर परिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉ .मृणाल जाधव यांना देण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, किनवट विधानसभा क्षेत्रातंर्गत अनुसूचित जातीची ३५ ते ४० हजार लोकसंख्या आहे .त्यांच्या पाल्यांना शिक्षणा करिता तालुक्याच्या ठिकाणी किनवट येथे यावे लागते. येथे वस्तीगृह उपलब्ध नसल्याने  व विद्यार्थ्यांची  आधीच आर्थिक बाजू कमजोर असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेणे अडचणीचे जाते. यापूर्वी वस्तीगृहाच्या नवीन इमारत बांधकाम करीता असलेला निधी  जागा उपलब्ध नसल्याने परत गेला होता.वस्तीगृहासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालया च्या बाजूला असलेली नगरपरिषदेच्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी व नवीन इमारती साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

   निवेदनावर मागासवर्गीय विद्यार्थी कृती समितीचे अॅड.सम्राट सर्पे,अश्विन देवराव लगेलीवार,विनोद चंद्रकांत भरणे 

सतिश उत्तमराव कापसे, संघर्ष अरविंद घुले, स्वप्नील चंद्रमणी सर्पे,प्रशीक चंद्रहार मुनेश्वर, अनिल अरविंद कांबळे,आकाश सर्पे , आनंद कावळे,सुगत भरणे,विनय सुद्दलवार, निखिल कावळे,विनोद रावळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

   निवेदनाच्या प्रति केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, मंत्री ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यासह सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Pages