आनंदाची बातमी; ग्रामपंचायतच्या मागणीला यश, पिसादेवी येथे शहर बससेवा सुरू..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 January 2023

आनंदाची बातमी; ग्रामपंचायतच्या मागणीला यश, पिसादेवी येथे शहर बससेवा सुरू..!

पिसादेवी : ग्रामपंचायत गेल्या अनेक दिवसांपासून  गावकऱ्यांच्या सोयीसाठी गावापर्यंत शहर बस सेवा सुरू करावी म्हणून पाठपुरावा करत होती. परंतु आंबेडकर चौक ते पिसादेवी पर्यंतच्या रस्त्यालगत झाडेझुडपे वाढली असल्याने बससेवा सुरू करण्यासाठी अडचणी येत होत्या. या झाडाझुडुपांमुळे बससेवा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकारी तयार होत नव्हते. याची दखल घेत नागरिकांच्या सोयीसाठी पिसादेवी ग्रामपंचायतच्या वतीने सदरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडीझुडुपी काढण्यात आली. त्यांनतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती देऊन बससेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली.


 या मागणीची दखल घेऊन सदरील अधिकाऱ्यांनी मंजुरी देत पिसादेवी गावासाठी बससेवा सुरू केली. आजच्या या पहिल्या बसचे उद्घाटन मा.रघुनाथ नाना काळे याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावकरी आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या बसचा विद्यार्थी वर्गाला 50 टक्के सवलतीच्या दरात पास मिळणार आहे. तसेच कामगार वर्ग व दररोज प्रवास करणाऱ्या नागरीकांना पासची सुविधा उपलब्ध आहे. तसेच 80 रुपयांच्या पासमध्ये एका दिवसासाठी दिवसभर करमाड, फुलंब्री, बिडकीन, खुलताबाद याठिकाणी प्रवास करता येणार आहे. या सुविधेचा पिसादेवी व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे पिसादेवी ग्रामपंचायतच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages