रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. मा. मा. येवले यांचा 84 वा अभिष्टचिंतन सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 January 2023

रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. मा. मा. येवले यांचा 84 वा अभिष्टचिंतन सोहळा



नांदेड --
जागतिक ज्ञानाचे प्रतीक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अध्वर्यू नेते रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाद्वारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक समाज भूषण पुरस्काराने सन्मानित नेते ॲड मा मा येवले यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथे केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे विश्वस्त ॲड मा मा येवले यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयु. प्रफुल्ल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली केले असून यावेळी प्रमुख व्याख्याता म्हणून नांदेड येथील सुप्रसिध्द विचारवंत डॉ राजेंद्र गोणारकर हे *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण चळवळीशी ध्येयाने एकनिष्ठता कशी जोपासावी* या विषयावर आंबेडकरी युवक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मा. डीपी सावंत, आंबेडकरी नेते मा. सुरेशदादा गायकवाड, आमदार श्री मोहनअण्णा हंबर्डे पाटील, माजी उपमहापौर स. सरजीतसिंघ गील, प्रा. कवी रविचन्द्र हाडसनकर, मा. दिगांबर मोरे, मा. रमेश सोनाळे, मा. सुखदेव चिखलीकर, मा. सुरेश हाटकर, मा. रमेश गोडबोले, मा. राजू एंगडे हिंगोली, मा. मंगेश कदम, मा. विकास कदम, मा. संजय कौठेकर, मा. सुभाष काटकांबळे, मा. साहेबराव पुंडगे, मा. ॲड विष्णू गोडबोले, मा. चंद्रकांत भोकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. म्हणून ॲड मा मा येवले यांचे हितचिंतक, रिपब्लिकन अनुयायी, मित्र मंडळी आणि युवक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ॲड मा मा येवले यांचे अभिष्टचिंतन करावे अशी विनंती प्रकाश येवले, सुभाष लोखंडे, संतोष नरवाडे, अशोक भोरगे, साहेबराव गायकवाड, गौतम येवले, माधव गायकवाड, तथागत ढेपे, राजू गच्चे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages