बिलोली (तालुका प्रतिनिधी) :
जयवर्धन भोसीकर
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तथा बिलोली स्वस्त धान्य दुकान तालुकाध्यक्ष संतोष शंकरराव बामने यांची काँग्रेसच्या 'हात से हात जोडो अभियानांतर्गत' सगरोळी जिल्हा परिषद गट सगरोळीच्या निरिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यात 'हात से हात जोडो' ही अभियान दि.२६ जानेवारी पासून राबवत आहे. त्या अनुषंगाने या 'हात से हात जोडो' अभियानांतर्गत अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे, त्याच अनुषंगाने सगरोळी येथील युवा काँग्रेस कार्यकर्ते तथा बिलोली तालुका स्वस्त धान्य दुकान तालुकाध्यक्ष संतोष शंकरराव बामने यांची सदरील 'हात से हात जोडो' या अभियाना अंतर्गत बिलोली तालुक्यातील सगरोळी जिल्हा परिषद गट काँग्रेस समिती निरिक्षक पदी निवड करून त्यांना दि.१६ जानेवारी रोजी नांदेड येथे एका बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. संतोष बामने यांची 'हात से हात जोडो' अभियानांतर्गत सगरोळी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेस समिती निरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे माजी खा. भास्कररावजी पाटील खतगावकर,आमदार जितेश अंतापुरकर,काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिनल पाटील खतगावकर,रवी पाटील खतगावकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,आदमपूरचे चेअरमन अंबादास शिनगारे,येसगीचे माजी सरपंच शिवराज पाटील येसगीकर,गंगाधर प्रचंड,चंद्रकांत लोखंडे,शिवराज बामने,गोविंद पाटील खतगावकर,आदीने अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment