किनवट : आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक व एलएफइ संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इआरसी शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित एकूण ३८ आश्रम शाळेतील २२५ प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक परिषद दिनांक ९ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न झाली.
प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांच्या ३ शैक्षणिक परिषदेचे आयोजन केंद्रनिहाय किनवट,सहस्त्रकुंड व भोकर या ठिकाणी करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या प्रवाहानुसार आश्रमशाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाच्या तंत्रात बदल होणे आवश्यक असल्याने या शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले गेले. विद्यार्थी गुणवत्ता वाढ व शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्य विकास हा मुख्य उद्देश्य समोर ठेवून आदिवासी विभागाने ह्या नवीन कालबद्ध उपक्रमाची निर्मिती केली आहे. या शैक्षणिक परिषदेसाठी सुलभक म्हणून विषय मित्र धम्मरत्न घुले व संदीप राठोड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या परिषदेच्या यशस्वितेसाठी मनोज टिळे (स.प्र.अ. शिक्षण), नागोराव चटलेवाड (स.प्र.अ. शिक्षण), संदीप कदम (आ.वि.नि.), स्मिता पहुरकर (आ.वि.नि.),दत्तात्रय डोंगशनवार, किरण बोर्डेजोशी, छाया तुप्पेकर, मालती गोरे, धनंजय उरकुडे यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच केंद्रस्तर आयोजनासाठी माधव देशमुखे, संजय पुरी, रामेश्वर जकीलवाड, उल्हास पवार, सुरेश जाधव, सुनील फेंडर यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment