जी २० परिषदेची तारीख ठरली !२७ व २८ फेब्रुवारीला शिष्टमंडळ शहरात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 January 2023

जी २० परिषदेची तारीख ठरली !२७ व २८ फेब्रुवारीला शिष्टमंडळ शहरात

औरंगाबाद:

जी २० परिषदे अंतर्गत बैठकीसाठी येत्या फेब्रुवारीच्या २७ आणि २८ तारखेला शिष्टमंडळ औरंगाबादमध्ये असेल. दोन दिवसांत बैठका आणि वेरूळ लेणी सफर असे नियोजन असल्याची माहिती आहे. संपूर्ण वेळापत्रक ठरले असून जिल्हा आणि मनपा प्रशासन परदेशी पाहुण्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहेत.


जी-२० देशांचे शिष्टमंडळ भारतातील काही प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. त्यात राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा समावेश आहे. यानुसार परिषदेनिमित्त राज्यात शिष्टमंडळाचा मुंबईचा पहिला, पुण्याचा दुसरा दौऱ्या झाला आहे. दरम्यान, विदेशी पाहुण्यांचा पाहुणचार व नियोजनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी औरंगाबादचे सहा अधिकारी नुकतेच पुण्याला जाऊन आले आहेत. जी-२० च्या वेळापत्रकानुसार २६ फेब्रुवारीस पाहुणे शहरात येतील. त्यानंतर २७ व २८ फेब्रुवारीस शिष्टमंडळ शहरात असेल.  
No comments:

Post a Comment

Pages