वाडी गावातील विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करणार - भिमराव बुक्तरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 January 2023

वाडी गावातील विविध मागण्यासाठी आमरण उपोषण करणार - भिमराव बुक्तरे

      नांदेड : जिल्हयातील सर्वात मोठी उत्पन्नाची ग्रामपंचायत  असलेली असा डंका जिल्हाभर पिटणाऱ्या ग्रा.पं.वाडी (बु.) ता.जि.नांदेड.

 येथील नगराअंतर्गत रस्ते, नाली, कचरा व्यवस्थापन नसणे, अशा प्रकारच्या समस्या असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

  सदरील समस्येबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार तोंडी व लेखी सांगून ते समस्या सोडवण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे  व इतर मागण्या संदर्भात.  गावातील  ( जुने गाव ) बौद्ध  स्मशानभुमी  ची  ७/१२ वर नोंद घेणे,स्मशानभुमी शेड व संरक्षण भिंत बांधून देऊन सुशोभीकरण करणे,संविधान सभागृह निर्मिती साठी जागा उपलब्ध करून देणे,घरकुल योजनेचा लाभ गरजू व कच्चे घरे असणाऱ्या तात्काळ देणे,

गावात खुली व्यायामशाळा  तात्काळ निर्माण करणे,

रोजगार हमी योजनेतील झालेल्या कामाची चौकशी करणे,दलीत वस्ती सुधार योजनात आलेल्या निधि व  झालेल्या कामाची चौकशी करणे, अशा विविध मागण्यासाठी दि २४ जानेवारी २०२३ पासून जिल्हा परिषद,कार्यालय, नांदेड. समोर आमरण उपोषणाला करणार असल्याची माहिती भिमराव बुक्तरे दिलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात  दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages