सगरोळी नांदेड बंद झालेली बस सेवा चालु करुन सायंकाळी मुक्कामी थांबवा आन्यथ सगरोळी रस्त्यावरुन एक ही बस धाऊ देनार नाही : शंकर महाजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 January 2023

सगरोळी नांदेड बंद झालेली बस सेवा चालु करुन सायंकाळी मुक्कामी थांबवा आन्यथ सगरोळी रस्त्यावरुन एक ही बस धाऊ देनार नाही : शंकर महाजनबिलोली ,जयवर्धन भोसीकर  :

     मौजे सगरोळी हे गाव १२ हजार लोकसंख्या असलेल गाव आहे तर या ठिकानी शिक्षणासाठी येनार्‍या विद्यार्थी ची संख्या ही जवळपास ४ हजार इतकी आहे.सगरोळी येथे सगरोळी ते नांदेड गाडी रोज जायाची व ति सगरोळीतच मुक्कामी असायची मुक्कामी असनार्‍या कर्मचार्‍याना आंघोळीला गरम पाणी जेवन हे संस्थे कडुन मिळायच. पण बिलोली आगार प्रमुखाला आचानक राजकीय दबाव आल्यामुळे ती मुक्कामी बस दूसर्‍या गावात मुक्कामी ठेवण्याचे आदेश दिले गेले जिथे गाडी मुक्कामी थाबते ते ठिकान बिलोली आगारात येतच नाही. तरी ती गाडी कधी सगरोळीला येते तर कधी येतच नाही या मुळे सगरोळी येथील शालेय विद्यार्थी नांदेड येथे दावखान्यासाठी जाणार्‍या जेष्ट नागरीक व गावकर्‍याना या मुळे नाहक ञास सहन करावे लागत आहे. या मुळे सगरोळी ग्राम पंचायत कडुन मागील ६ महीन्या पासुन मासीक सभेचे ठराव जोडुन आनेक तक्रारी अर्ज ही केले गेले पण या सर्व तक्रारी अर्जा कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या मुळे हि शेवटची तक्रार/ ईशारा देण्यात येत आहे. असे उल्लेख वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य शंकर महाजन येना केली आहे  तसेच सगरोळी ते नांदेड गाडी दररोज देण्यात यावे व ती सगरोळीलाच मुक्कामी ठेवण्याचे आदेश १५ दिवसात काढण्यात यावे आन्यथा   सोळाव्या दिवशी सगरोळी रस्त्यावरुन एक ही आपल्या महामंडळाची गाडी धाउ दिली जानार नाही यात कायदा सुवेवस्थेचा प्रक्ष निर्मान झाल्यास सर्वस्वी आपन आपले प्रशासन जबाबदार राहील असा ही इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य शंकर महाजन यानी दिले आहे तर या निवेदणावर राज्य परिवहन विभाग काय निर्णय घेईल या कडे गावकर्‍याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Pages