नांदेड :
नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही नवीन विशेष रेल्वे गाडी द्वि-साप्ताहिक स्वरूपात धावणार असून नांदेड मार्गे वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या मार्गावरून या विशेष गाडीच्या तूर्त 20 फेऱ्या करण्याचे ठरविण्यात आले आहे. सध्या ही गाडी सोमवार आणि बुधवारी नांदेड येथून तर मंगळवार आणि गुरुवारी कुर्ला येथून सुटणार आहे.
गाडी क्रमांक 07426 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 30 जानेवारी आणि 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारी, 2023 ला अर्थात दर सोमवारी रात्री 21.15 वाजता नांदेडहून सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.
तर गाडी क्रमांक 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नांदेड : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 31 जानेवारी आणि 7, 14, 21 आणि 28 फेब्रुवारी, 2023 ला अर्थात दर मंगळवारी दुपारी 16.40 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07428 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 25 जानेवारी आणि 1, 8, 15 आणि 22 फेब्रुवारी, 2023 ला अर्थात दर बुधवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नांदेड : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 26 जानेवारी आणि 2, 9, 16 आणि 23 फेब्रुवारी, 2023 ला अर्थात दर गुरुवारी दुपारी 16.55 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्यांत वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर क्लासचे डब्बे असतील.
No comments:
Post a Comment