चंद्रपूर : म. न. पा क्षेत्रात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन जनसंपर्क अभियान गुरुवारपासून सुरू करण्यात आले,चंद्रपुरातील गोंड राजाच्या राजवटीपासून शहराचे मुख्य प्रवेश द्वार असलेले पठाणपुरा येथून अभियानाला पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतीक डोर्लीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले.सदर अभियान चार टप्पायात होणार असून संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र पिंजून करण्याचा मानस कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा आहे .
चंद्रपूर शहरातील सर्व वॉर्डातील नागरिकांना मुबलक व मोफत नळाचे पाणी उपलब्ध करून देणे हीच रिपब्लिकन जनसंपर्क अभियानची प्रमुख मागणीआहे.
या अभियानाचे मुख्य उद्देश संबंधित वॉर्डातील नागरिकान सोबत हितगुज करून त्यांचे समस्या जाणून घेणे हाच आहे जेणेकरून सदर समस्यांच्या पाठपुरावा जिल्हा प्रशासन किंवा महानगरपालिका प्रशासन यांच्या कडे सातत्याने करून समस्याचे निराकरण झाले पाहिजे.तसेच शासनाच्या ज्या योजना किंवा अनुदानाचा लाभ तळागाळातील उपेक्षित घटनकाना मिळाला नाही त्यासाठी सुद्धा पाठपुरावा करणे आहे.या अभियानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना दिलेल्या प्रत्येक अधिकाराची जनजागृती करणे आणि अमलबजावणी करण्यासाठी शासनाला कटिबध्द करणे आहे.सादर अभियानाचे संयोजक राजस प्रविण खोब्रागडे, राजुभाऊ खोब्रागडे, प्रेमदास बोरकर,सचिन पाटील,निर्मला नगराळे,मृणाल कांबळे,प्रेरणा करमरकर,अश्विनी आवळे, अनिता जोगे, लीना खोबरागडे, छाया थोरात, परिनिता रामटेके, सुनीता बेताल, वैशाली साठे,अश्विनी खोबरागडे,अशोक सागोरे,हरिदास देवगडे,विजय करमरकर, कैलाश शेंडे, अरुण शेंडे, वामनराव चांद्रिकापुरे, गोल्डी शाहारे,विशाल चीवंदे, माणिक जुमडे, सिध्दार्थ शेंदे आहेत.या अभियानाला नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग भेटत आहे.
No comments:
Post a Comment