मुंबई : नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक श्री. संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती राहणार आहे.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि महानगर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची घोषणा उद्या करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे..
परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी संतोष पांडागळे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडी बद्दल पांडागळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीबदल संतोष पांडागळे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूर खान, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, आदींचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment