औरंगाबाद :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी पी.ई.एस. सोसायटी अंतर्गत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाला संलग्नित अजिंठा वसतिगृहात राहून आजपर्यंत हजारो विद्यार्थांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
तथापि मागच्या दोन दशकापासून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत वादामुळे मिलिंद महाविद्यालय आणि या वसतिगृहाची दुरावस्था होत आहे. हे लक्षात घेऊन बांधिलकी सोशल फाउंडेशन ने श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत पीपल्स च्या आजी माजी विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. यावेळी डॉ. कैलास बनसोडे, इंजि. अविनाश कांबळे, मिलिंद शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती हिवाळे, ऍड. आकाश मगर, इंजि. आकाश जाधव, इंजि. रोहित चाटसे, शंकर रगडे, रत्नदीप रगडे, रोहित वारे, करण मगरे, महेश अन्नपूर्णे, सिद्धू गाढेकर, हर्ष महाजन, शुभम वानखडे, सुभेदार राऊत, सुमित खंदारे, ऋषीकेश म्हस्के यांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment