औरंगाबाद, दि.२२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा पंधरवाडा निमित्त ’जागर मराठीचा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन २३ ते २५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती समन्वयक डॉ.वैâलास अंभुरे यांनी दिली.
मराठी भाषा पंधरवाडा निमित्त ’मराठी भाषा व वाड्ःमय विभाग तसेच राज्य शासनाचा भाषा संचालनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागर मराठीचा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन २३ ते २५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे विभागाच्या सभागृहात सोमवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी ’मसाप’चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांचे ’औरंगाबाद जिल्ह्ची साहित्य व सांस्कृतिक परंपरा’ या विषयावर व्याख्यान होईल. तसेच यावेळी यशवंतराव चव्हाण राज्य वाड्ःमय पुरस्कार प्राप्त कवी हबीब भंडारे यांचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य, समन्वयक डॉ.कैलास अंभुरे व भाषा संचालक विजया ला.कोनीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मान्यवरांचे अनुभव कथन
’जागर मराठीचा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे ’माझे वाचन’ या विषयावर मंगळवारी (दि.२४) ’अनुभव कथन’ होणार आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, वित्त व लेखाधिकारी शरद भिंगारे, आकाशवाणीच्या कार्यक्रमाधिकारी नम्रता फलके यांचे अनुभवकथन होईल. तसेच ’एमजीएम’ विद्यापीठातील चित्रपट कला विभागाचे प्रमुख, प्रख्यात दिग्दर्शक प्रा.शिव कदम यांचे चित्रपट लेखन विषयक मार्गदर्शन होणार आहे. तसेच अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कारप्राप्त लघुपटांचे सादरीकरण होणार आहे. या संपुर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी विभागातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment