प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद ; प्रा.चंद्रशेखर हिवरे यांचा सेवागौरवार्थ आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 22 January 2023

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद ; प्रा.चंद्रशेखर हिवरे यांचा सेवागौरवार्थ आयोजन

औरंगाबाद, दि.२२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातर्पेâ येत्या २७ व २८ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर हिवरे यांच्या अध्यापन, संशोधन कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे.

अध्यापक व संशोधक विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने विद्यापीठातील सर्वात मोठा व देशभरात नामांकित असा हा विभाग आहे. विभागाच्यावतीने मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २७ व २८ जानेवरी रोजी ’अनिमल फिजीयॉलॉजी व इकॉलॉजी’ या विषयावर राष्ट्रीय परिषद होत आहे. विभागातील प्राध्यापक तसेच माजी रेशीम उद्योग संचालक डॉ.चंद्रशेखर जलबा हिवरे यांच्या सेवा गौरवनिमित्त ’अ‍ॅडव्हान्सेस इन पॅरासायटॉलॉजी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिषदेचे उद्घाटन प्रा.पी.नागराजा राव यांच्या हस्ते होणार असून समारोपप्रसंगी डॉ.डी.डेव्हिड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषदेत प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे अधिष्ठात डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.श्याम कुमार, डॉ.एस.बी.झाडे, डॉ.दीपक भारसाखळेआदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषदेत १५५ शोधनिबंध सादर होणार असून चार सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. परिषदेच्या संयोजन समितीत विभागप्रमुख डॉ.ई.आर.मार्टिन, डॉ.रमेश चोंडेकर, डॉ.राम चव्हाण, डॉ.सुनीता बोर्डे यांच्यासह सदस्य प्रयत्नशील आहेत.

’झुलॉजी फोरम’ची स्थापना करणार

डॉ.नागभूषणम् यांच्यासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्राध्यापक, संशोधकांमुळे देशातील नावाजलेला विभाग म्हणून विभागाची ओळख आहे. या विभागाच्या माजी विद्यार्थ्यांसह देशभरातील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधकांचा ’झुलॉजी फोरम’ या निमित्तने स्थापन करण्यात येणार आहे. या ’फोरम’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी अधिसभा सदस्य डॉ.लक्ष्मीकांत शिंदे, डॉ.आर.जे.चव्हाण, डॉ.संजय नन्नावरे, डॉ.करुणा परदेशी आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages