बौद्ध धम्माच्या भव्य पदायात्रेचे शहरात आगमन ; बौद्ध उपासक डॉ.अरुण शिरसाट यांची माहिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 January 2023

बौद्ध धम्माच्या भव्य पदायात्रेचे शहरात आगमन ; बौद्ध उपासक डॉ.अरुण शिरसाट यांची माहिती

औरंगाबद: येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्षु संघ थायलंड येथील 110 भन्तेचा सहभाग असलेल्या बौद्ध धम्म पदयात्रेचे शहरात आज आगमन होत आहे,याचे आयोजन सिद्धार्थ हत्तीहंबीरे डॉ. गगन मलिक सिनेअभिनेते ज्यांनी भगवा गौतम बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रसार व प्रचार करण्याचा निर्धार केला आहे त्यांच्यासोबत थायलंड येथील भंते लांगफुजी, भंते सोंगसेक फेटालियन, सिरीलक मेथाई व कॅप्टन नटकीत या थायलंड वरून आलेल्यांचा मान्यवर यांचा समावेश आहे. ही धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई येथे दिनांक १७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी यादरम्यान हि पदायात्रा निघालेली आहे, दि.१७ जानेवारी ते २६ जानेवारी असा पदयात्रेचा  शंभर किलोमीटरचा प्रवास आज रोजी पूर्ण झालेला असून आज औरंगाबाद येथे सायंकाळी ठीक ०७ वाजता आगमन आणि केम्ब्रिज चौक येथे पदयात्रेचा मुक्काम होणार आहे,तसेच बुद्धांच्या अस्थींचे दर्शन आणि भंतेजींचे भव्य स्वागत होणार आहे.

उद्या दिनांक २७ जानेवारी रोजी तिसगाव येथे भंतेजींच्या संघाचे भव्य स्वागत व बुद्ध अस्थींचे चे दर्शन होणार आहे तर २८ जानेवारी रोजी बुद्ध अस्थींचे चे दर्शन व भन्तेचे भव्य स्वागत लासुर स्टेशन येथे होणार आहे.

अशी माहिती पादयात्रेचे मुख्य शहर समन्वयक डॉ. अरुण शिरसाट बुद्ध उपासक यांनी दिली, संपर्कप्रमुख म्हणून प्रा. शिलवंत गोपनारायन हे जबाबदारी पार पाडत आहेत.शहरातील नागरिक व सर्व अनूयायी यांनी बौद्ध अस्थींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन यावेळी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages