औरंगाबाद-मुंबई-औरंगाबाद विशेष रेल्वे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 January 2023

औरंगाबाद-मुंबई-औरंगाबाद विशेष रेल्वे

औरंगाबाद :

मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून ‘ट्रेन्स ओन डिमांड’ श्रेणीमध्ये मुंबई सी.एस.एम.टी. ते औरंगाबाद आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते औरंगाबाद या विशेष गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. तसेच औरंगाबाद – मनमाड दरम्यान शटल ट्रेनच्या दोन फेऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी निश्चित केल्या आहेत.


असे आहे वेळापत्रक


गाडी क्रमांक (01475) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - औरंगाबाद : ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 27 जानेवारी, 2023 ला रात्री 00.55 वाजता सुटेल आणि ठाणे, मनमाड, रोटेगाव मार्गे औरंगाबाद येथे सकाळी 08.15 वाजता पोहोचेल.


गाडी क्रमांक (01476) औरंगाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई : ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 27 जानेवारी, 2023 रात्री 20.00 वाजता सुटेल आणि लासूर, मनमाड, कल्याण, ठाणे मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे 28 जानेवारी ला सकाळी 03.30 वाजता पोहोचेल.


गाडी क्रमांक (01474) औरंगाबाद - सी.एस.एम.टी. मुंबई : ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 30 जानेवारी, 2023 रात्री 20.00 वाजता सुटेल आणि लासूर, मनमाड, कल्याण, ठाणे, दादर मार्गे सी.एस.एम.टी. मुंबई येथे 31 जानेवारी ला सकाळी 03.50 वाजता पोहोचेल.


गाडी क्रमांक (01477) मनमाड ते औरंगाबाद शटल ट्रेन : ही गाडी दिनांक 27 जानेवारी, 2023 ला मनमाड येथून सकाळी 08.25 वाजता सुटेल आणि रोटेगाव, लासूर मार्गे औरंगाबाद येथे 11.30 वाजता पोहोचेल.


गाडी क्रमांक (01478) औरंगाबाद ते मनमाड शटल ट्रेन : ही गाडी दिनांक 27 जानेवारी, 2023 ला दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि लासूर, रोटेगाव मार्गे मनमाड येथे दुपारी 14.30 वाजता पोहोचेल.
No comments:

Post a Comment

Pages