राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती निमित्त किनवट येथे कार्यक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 January 2023

राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती निमित्त किनवट येथे कार्यक्रम

ता. प्र. किनवट:-

माळी समाज व बहुजन समाज यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दि. 28 रोजी ११ वाजता महात्मा फुले चौक , गोंडराजे मैदान येथे या कार्यक्रमास सुरवात होणार आहे .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदरावजी वाढे मा. शिक्षणाधिकारी जि. प. नांदेड तर स्वागताध्यक्ष ज्योतीबा खराटे हे राहणार आहेत.

शाहीर सम्राट डॉ. देवानंदजी माळी सांगलीकर यांचा शाहीरी पोवाड्याचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे .

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. खासदार हेमंत पाटील , मा.आमदार भिमराव केराम, मा.प्रज्ञाताई सातव, मा. कल्याणराव आखाडे, मा. आमदार प्रदीप नाईक, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे,आनंद मच्छेवार, फिरोज दोसाणी, सुनिल बेहरे, अभी. प्रशांत ठमके, प्रकाश गायकवाड, दिनकर दहीफळे, अरुण आळणे, विनोद भरणे, अशोक नेमानिवार, सुकुमार पेटकुले, अॅड खुशाल शेंडे, गोरखनाथ राऊत, सौ. जनाबाई डुडुळे, सौ. विमलताई खराटे, सौ. संध्याताई राठोड, नामदेव कातले, सौ. अनुसया सिडाम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सत्कारमुर्ती श्रीनिवास नेम्मानिवार, कैलास भगत, शे. अफरोज शे. लतीफ, अमीन चव्हाण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

तर संयोजन समिती तुळशीराम वाडगुरे, अध्यक्ष राजु पेटकुले, यश खराटे कार्याध्यक्ष, निमंत्रक संजय गुरनुले, राज कुमार बावीस्कर, सुनिल खामकर, राहुल वाढे आदी मंडळींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages