स्वच्छ आस्थापना स्पर्धेत किनवट शहरातील "माहेर हाॅस्पिटल" ने अव्वल क्रमांक पटकावला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 January 2023

स्वच्छ आस्थापना स्पर्धेत किनवट शहरातील "माहेर हाॅस्पिटल" ने अव्वल क्रमांक पटकावला

 


किनवट/प्रतिनिधी- 

किनवट नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ किनवट सुंदर किनवट २०२३ या मोहिमे अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठीची ही स्पर्धा होती. न.प.च्या प्रशासक डाॅ.मृणाल जाधवांच्या हस्ते उत्तेजनार्थ २६ जानेवारी रोजी प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

       स्वच्छ भारत मिशन अंतर्गत "स्वच्छ किनवट-सुंदर किनवट २०२३" या सदराखाली स्वच्छते विषयक स्पर्धा संपन्न झाल्या. उल्लेखनिय म्हणजे शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांचा या मोहिमेत अंतर्भाव केला होता. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे स्वच्छतेचे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. यातून जागरुकता निर्माण होऊ शकते. किनवट नगर परिषदेच्या प्रशासक तथा तहसिलदार डाॅ.मृणाल जाधवांनी हा महत्वपूर्ण उपक्रम राबवला हे विशेष.

       या नाविन्यपूर्ण उपक्रमात किनवट शहरातील शिवाजीनगरातील "माहेर हाॅस्पिटल" चा स्वच्छतेच्या निकषातून पहिला क्रमांक आल्याने प्रशासक डाॅ.मृणाल जाधव आणि स्वच्छता निरीक्षक तथा नोडल आॅफीसर चंद्रकांत दुधारेंच्या स्वाक्षर्‍यांच्या प्रशस्तीपत्रासह सन्मानचिन्ह देऊन २६ जानेवारी २०२३ रोजी डाॅ.अनिल राठोड व डाॅ.सौ.राठोडांचा न.प.कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, गटनेते जहिरोद्दीन खान, नगरसेवक ईम्रानखान, अभय महाजन यांच्यासह अनेकांंची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages