सगरोळी येथे अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 January 2023

सगरोळी येथे अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

जयवर्धन भोसीकर 

बिलोली(तालुका प्रतिनिधी)      

तालुक्यातील  धार्मिक स्थळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सगरोळी येथे प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी भव्य अशा अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह दि.३० जानेवारी ते ६ फेबुवारी या दरम्यान होणार आहे.या मध्ये सकाळी ४ ते ६ काकड आरती स.६ ते ८ ज्ञानेश्वर पारायण,स.१० ते १२ दु. गाथा भजन,सायंकाळी ५ ते ६ प्रवचन,सा.६ ते ७ हरिपाठ, असे सतत आठ दिवस धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तसेच दि.३० जाने.सोमवार रोजी ह.भ.प.मधुसुदन महाराज कापसीकर दि.३१ जाने.मंगळवार रोजी ह.भ.प.गंगाधर महाराज वसुरकर,दि.१ फेब्रु.बुधवार रोजी ह.भ.प.मोहन महाराज हांडे किल्लारी,दि.२ फेब्रु.गुरूवार रोजी ह.भ.प.रघूवीर महाराज हेळंबकर,दि.३ फेब्रु.शुक्रवार रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज हांडे पंढरपूरकर,दि.४.फेब्रु.शनिवार रोजी ह.भ.प.विश्वनाथ महाराज काकांडीकर उर्फ बाबू महाराज,दि.५ फेब्रु.रविवार रोजी ह.भ.प.प्रशांत महाराज खाणापूकर रेणापूर,दि.६ फेब्रु.रोजी सोमवार ह.भ.प.प्रशांत महाराज खाणापूकर रेणापूर यांच्या काल्याचे किर्तन व महा प्रसादाचे  कार्यक्रम होणार आहे. तरी तालुक्यातील भावीक भक्तानी या कार्यक्रमाचा लाभ द्यावा सशी विनंती विठ्ठल रूक्मिणी ट्रस्ट च्या वतीने व समस्त गावकरी  यांच्या वतीने .करण्यात  येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages