औरंगाबाद: येथे भव्य बौद्ध धम्म पदयात्रेने शहरात उत्साह दिसून आला. भव्य बौद्ध धम्म पदयात्रेच्या निमित्ताने मुख्य आयोजक मा.सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि सिनेअभिनेते गगनजी मलिक यांच्या अथक प्रयत्नाने ही धम्म यात्रा यशस्वी झाल्याचे औरंगाबादकरांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
बुद्ध अस्थीचे दर्शन व थायलंड, चीन, म्यानमार इत्यादी ठिकाणाहून आलेल्या भंतेजींचे जागोजागी रांगोळीच्या देखाव्याने आणि फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले तसेच भतेंना पाणी, थंड पेय, फळे, धम्मयात्रेत चालणाऱ्या लोकांसाठी सुद्धा अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था केली होती.
बुद्ध अस्थी व भन्तेचे स्वागत त्यांच्या माध्यमातून आशीर्वाद घेत-घेत औरंगाबाद दुमदुमून गेले होते, शेकडो बुद्ध उपासक उपसिका, मराठा, शीख, मुस्लिम सर्व जातीधर्माच्या उपस्थितांनी मनोभावे दर्शन घेतले, मुख्य संयोजक मा. सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांचे प्रमुख उपस्थिती डॉ. राजेश लाडे,औरंगाबाद शहराचे समन्वयक डॉ. अरुण भाऊ शिरसाट यांनी या कार्यक्रमाचे मुख्य नियोजन केले होते तर यावेळी ऍड. राहुल साळवे प्रा.शिलवंत गोपनारायण, चंद्रशेखर साळवे, रवि लोखंडे, मंजुताई लोखंडे, लक्ष्मीताई पाखरे, पंचशीला पाखरे, रमा मोकळे, सुमाननबाई पाखरे, राहुल भिवसने, सचिन लोखंडे, अक्षय भिवसने, रोहित लिहिणार, डॉ.मिलिंद आठवले,
प्रा.भारत शिरसाठ, अमरदीप वानखडे, नरेंद्र आटोटे, प्रमोद धुळे व सचिन खैरे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment