स्त्री शक्ती हे कुटुंबाचे हृदय आहे--सौ.निता दमकोंडवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 January 2023

स्त्री शक्ती हे कुटुंबाचे हृदय आहे--सौ.निता दमकोंडवार

जयवर्धन भोसीकर

कुंडलवाडी (वार्ताहार)-  प्रत्येक माता संस्काराने एक उत्तम चरित्र आपल्या मुलांमध्ये घडवू शकते म्हणून स्त्रीशक्ती हे कुटुंबाचे हृदय आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथील सहशिक्षिका सौ. नीता सुधाकर दमकोंडवार (दरबस्तेवार) यांनी केले. ते बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावलगाव यांनी आयोजित केलेल्या माता पालक मेळावा व विविध गुणदशॅन कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.  या माता पालक मेळावा व विविध गूणदरशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बावलगाव चे सरपंच लक्ष्मण इरबा गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बिलोली गटसाधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी बी. एम. पाटील, उपसरपंच रमेश छप्पेवार ,केंद्रप्रमुख नामदेव मगडलवार ,तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव पटणे, दत्ता नामगोंडे, सौ. बानाबाई मदनुरे, सौ. पद्मीन बाई पटणे, सौ. कल्पना शिरगिरे ,सौ. सारिका मॅकलवार, सौ .कल्पना मुळावकर ,सौ.शोभा तोटावाड ,सौ. हत्ते मॅडम ,सौ. करडे मॅडम ,परमेश्वर रत्नापारखे ,पत्रकार प्रा. मोहसीन खान ,शिवराज रायलवाड ,बसवंत मुंडकर ,गुणवंत हलगरे ,सुरेश राठोड, प्रल्हाद ढाकणे सह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे  सौ.दमकोंडवार  बोलताना म्हणाल्या की, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणे हे मातेचे कर्तव्य आहे. स्त्री शक्ती हे कुटुंबाचे रदय आहे. हे हृदय सतत चांगल्या विचारांचे व आदर्श व्यक्तीचे गुण घेण्यासाठी सतत धडपडत असावे. स्त्रीची मातृत्व शक्ती व समर्पण शक्तीच संस्कार जतन करू शकते. याशिवाय आई-वडिलांनी पैशाबरोबर आपल्या प्रत्येक पाल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारातून वेळ काढून पाल्याला वेळ दिला पाहिजे. जिजामातेमुळे शिवबा घडले हे आदर्श प्रत्येक मातेने आपल्या डोळ्यासमोर ठेवून हे कर्तव्य पार पाडले पाहिजे व आपल्या पाल्यात शिवबा सारखे व्यक्तिमत्व घडविले पाहिजे. कारण प्रत्येक माता संस्काराने उत्तम चरित्र आपल्या मुलांमध्ये घडवू शकते. उत्तम चरित्र घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर संस्काराची जोड असली पाहिजे असे सांगून मातांनी शिक्षणाबरोबर आपल्या मुलावर संस्काराचे जतन करण्यासंबंधी त्या मार्गदर्शन केल्या. याप्रसंगी विठ्ठल छप्पेवार विजयाबाई अडगुलवाड यांचेही मनोगत झाले. सदरील माता पालक मेळावा व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ ,माता पालक संघ ,ग्रामपंचायत चे सर्व सदस्य ,सरपंच, ग्रामस्थ ,शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड, सहशिक्षक राजाराम कसलोड ,सौ. शारदा कणशेट्टे, सौ कल्पना बोधने, गंगाधर रामटक्के यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक साईनाथ राचेवाड, प्रास्ताविक राजाराम कसलोड तर उपस्थितांचे आभार   माणिक शिरगिरे यांनी मानले. या कार्यक्रमास बावलगावचे समस्त ग्रामस्थ ,माता भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages