बिलोली , जयवर्धन भोसीकर :
बिलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात पालक मेळावा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वस्तीग्रहाचे गृहपाल पवन पल्लेवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर पत्रकार सुनिल कदम. भिमराव बडूरकर. गौतम लंके. बालाजी यलगंदरे आदींची उपस्थिती मान्यवरांनी . घटनेचे शिल्पकार. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुश्पहार अर्पण करुन मान्यवरांनी महापुरुषानां अभिवादन केले.
यावेळी . गृहपाल पल्लेवाड यांनी प्रास्ताविकातून वस्तीगृहातील सोयीसुविधांची माहिती दिली तसेच मुलांच्या पुढील वाटचालीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती दिली. पत्रकार सुनिल कदम बालाजी यलगंदरे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक चंदनकर यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास निश्चितपणे यश गाठता येईल असे मार्गदर्शन केले. यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वसतिगृहातील एम.आर.बोधगिरे.पि.के.संगमकर पिराजी जी. मेळगावे. एस,आय.नांगरे. किर्तिराज जाधव. आर.व्हि. शेरफुले.एस बी. चोबेकर आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सुमेध सुनिल कदम यांनी सूत्रसंचालन केले. आभार गंगाप्रसाद एंनगंटवार यांनी मानले.
No comments:
Post a Comment