मुंबई विद्यापीठात "मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती" या विषयावर डॉ. अनिल सकपाळ यांचे व्याख्यान संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 25 January 2023

मुंबई विद्यापीठात "मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती" या विषयावर डॉ. अनिल सकपाळ यांचे व्याख्यान संपन्न



 मुंबई : राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाच्या  मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत ३६ जिल्हे ३६ व्याख्याने होणार असून "मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती" (महानगरीय साहित्य) या विषयावर  समीक्षक व कादंबरीकार डॉ. अनिल सपकाळ यांचे व्याख्यान आज मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन या ठिकाणी पार पडले. 


यावेळी "महानगरी साहित्य हे आधुनिक जाणिवांचे साहित्य असून या साहित्यातून बहुसांस्कृतिकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे." असे प्रतिपादन डॉ. अनिल सपकाळ  यांनी केले. 


मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत झालेल्या या व्याख्यानाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद कुमरे, परिचय डॉ. सुनिल अवचार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शामल गरुड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages