केद्रं सरकारचा निषेध, कापसाला १२ हजार ,तुरीला १०, तर सोयाबिनला ८ हजार भाव द्या - काॅ.अर्जुन आडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 25 January 2023

केद्रं सरकारचा निषेध, कापसाला १२ हजार ,तुरीला १०, तर सोयाबिनला ८ हजार भाव द्या - काॅ.अर्जुन आडे

किनवट,ता.२५(बातमीदार):अखिल भारतीय किसान सभा तथा संयुक्त किसान मोर्चा ने दिलेल्या देशव्यापी हाकेला प्रतिसाद देत जिजामाता चौकात किसान सभा, लाल बावट्याच्या वतिने आज(ता.२५)आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या नियात आयात धोरनांने शेतकरी हवालदिल झाला आहे .शेतीपिकांचे भाव कोसळेल आहे.भाव वाढेल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांवर आधिच अतिवृष्टीने घायाळ असतांना परत एकदा कापूस, सोयपेंढ,तुरीची विदेशातून आयात करुन भारतीय शेतकऱ्यांवर मिठ चोळण्याचे काम मोदी प्रणित भा.ज.पा सरकारने केले आहे.तातडीने शेतकरी विरोधी धोरन मागे घेऊन कापसाला १२ हजार,तुरीला १० हजार,सोयाबिणला ८ हजार रुपये भाव देण्याची मागणी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी केली.

आंदोलनात हमीभाव, हमी खरेदिचा केद्रिंय कायदा करा,कामगार विरोधी कायदे वापस घ्या, वनजमिन,गायराण जमिन कसणा-या शेतकऱ्यांच्या नावे करा,शेतकरी विरोधी विज विधेयक बिल वापस घ्या,किमान वेतन लागू करा,जि.प तथा बांधकाम विभागाअंतर्गत सुरु असलेल्या रस्ताच्या कामाची चौकशी करा. पिंपरी,भंडारवाडी,मांजरीमाता,तोटंबा आदि गावांना जाण्याचा रस्ता तयार करा, मंजूर झालेली पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करा,दुध उत्पादन शेतकऱ्यांना दुधाचे योग्य भाव द्या आदि मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.आंदोलनात किसान सभेचे काॅ.अर्जुन आडे,काॅ.खंडेराव कानडे, काॅ.शेषराव ढोले,काॅ.मोहन जाधव,काॅ.शिवाजी किरवले, काॅ.प्रकाश ढेरे,काॅ.अंबर चव्हाण, काॅ.अडेलु बोनगीर, काॅ.धनराज आडे,काॅ.विजय जाधव, शे.मुसा, काॅ.बाबा कारपेंटर, मनोज सल्लावार,काॅ.प्रकाश वानखेडे काॅ.गंगाराम गाडेकर आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलना दरम्यान आंदोलनकर्तेनां अटक करून सोडून देण्यात आले.


No comments:

Post a Comment

Pages