भाषा ही संवादाने फुलत जाते - स्वप्नील भालेराव बळीराम पाटील भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 25 January 2023

भाषा ही संवादाने फुलत जाते - स्वप्नील भालेराव बळीराम पाटील भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात


किनवट ता.२५ (बामतीदार): भाषा ही संवादाने फुलत जाते त्यामुळे घरी, कार्यालयात आणि भेटीच्या प्रसंगी एकमेकांशी मराठी मध्येच संवाद साधत, अभिव्यक्त झाले पाहिजे, असे मत प्रमुख वक्ते पत्रकार स्वप्नील भालेराव यांनी व्यक्त केले. बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने आज(ता .२५)मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.या वेळी ते बोलत होते. 


प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, उद्घाटक प्रसिद्ध कवी, साहित्यिक तथा वकिल  के. के. साबळे, सांगावाकार महेंद्र नरवाडे, कवी प्रा. गजानन सोनोने, दीपक खंदारे, डॉ. शुभांगी दिवे, प्रा. आम्रपाली हटकर, डॉ. योगेश सोमवंशी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले. 


पुढे बोलतांना भालेराव म्हणाले की, मराठी भाषा ही मायबोली आहे. भाषेतील गोडवा हा बोलीतून व्यक्त होत असतो. ती बोली भाषेतून टिकून राहिली पाहिजे यासाठी भाषेचे संवर्धन व जतन करावे.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ .बेंबरेकर यांनी केला. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद जाधव यांनी केले तर, आभार डॉ. विजया खामनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दयानंद वाघमारे, प्रा. अजय पाटील, प्रा. सुलोचना जाधव, प्रा. सतीश मिरासे, डॉ. रचना हिपळगावकर यांनी पुढाकार घेतला. या प्रसंगी मराठी भाषेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages