किनवट,ता.२५(बातमीदार): बोधडी(बु.ता.किनवट) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत प्राथमिक आरोग्य पथक दत्तनगर, पाटोदा येथील कार्यरत डॉ. संगीता भंगे या सतत गैरहजर रहात असल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा व उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.
तालुका हा आदिवासी तालुका म्हणून सर्व ज्ञात आहे. तालुक्यापासून नांदेड हे जिल्ह्याचे मुख्यालयाचे अंतर १५० किलोमीटर असल्याने शासनाने तालुक्यातील नागरिक हे आरोग्य सुविधेअभावी वंचित राहू नये म्हणून बोधडी (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत प्राथमिक आरोग्य पथकाची नेमणूक पाटोदा येथे केली आहे. त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करत सुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी बू अंतर्गत प्राथमिक आरोग्य पथक, दत्तनगर येथे डॉ. संगीता भंगे यांची नियुक्ती असताना गेल्या अनेक महिन्यापासून त्या आरोग्य सेवा देण्यास कुचराई करत असल्याचे दिसून येत आहे. यावर बोधडी बू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरबाब ही खरी असल्याचे सांगितले व तसा पत्र व्यवहारही आपण वरिष्ठ कार्यालयास केला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष जाय मोक्यावर पाहणी केली असता पाटोदा आश्रम शाळेतील एका खोलीमध्ये डॉ .संगीता भंगे या आठवड्यातून एक ते दोन दिवस उपस्थित राहतात असे मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी सांगितले. ओ. पी. डी. च्या ठिकाणी नेहमी कुलूपच असते, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्र, बोधडी मार्फत झालेल्या पत्र व्यवहारावर कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित होत असून झालेल्या प्रकारामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यात जिल्ह्याचे आरोग्य खाते जबाबदार राहणार एवढे मात्र खरे आहे.
No comments:
Post a Comment