औरंगाबाद: दि.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात तीव्र निदर्शने करण्यात आली, स्वाधार योजनेच्या माध्यमातून गरीब, वंचित, गरजू, होतकरू, गुणवंत विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा हा उद्देश असला पाहिजे, मात्र कार्यलायामार्फत लाभार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सतत अनेक जाचक अटींना आणि तारखांसंदर्भात भूलथापांना बळी पडावे लागत आहे, महिला विद्यार्थिनींना त्यांच्या लग्नाच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने विचारपूस केल्या कारणाने महिलांना नाहक प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे. कार्यालयातील महिला कर्मचारी विद्यार्थ्यांच्या पालक व नातेवाईक यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या अनेक तक्रारी आहेत,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत कुठल्याच प्रकारचा संबंध नसतांना १० वी आणि १२ वी च्या टक्केवारी संदर्भात त्रुटी मुळे विद्यार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, शैक्षणिक खंड असल्यास लाभ मिळणार नाही असे सांगून लाभापासून दूर देऊन एक प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना मुद्दामच त्रास दिल्या जाण्याच्या प्रकार बघायला मिळतो, वर्षानुवर्षे पाठपुरावा करून सुध्दा योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होत नसतांना योजनेचा मुख्य उद्धेश कसा पूर्ण होत असेल, याबाबत शंका उपस्थित होते, ह्या आणि ह्या समान अनेक जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात या बाबत निवेदन व निदर्शने करण्यात आली, डॉ.अरुण शिरसाट शहर जिल्हाध्यक्ष औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जा.विभाग यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आणि निवेदन देण्यात आले यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष मा. इब्राहिम पठाण, प्रा.शिलवंत गोपणारायन, संतोष भिंगारे, किशोर सरोदे, आनंद भामरे, हरचरणसिंग गुलाटी, रेखाताई राऊत महिला अध्यक्ष, लतीफ पटेल, राहुल इंगळे, एम ए अझहर पर्यावरण अध्यक्ष, संजय डोंगरदिवे, रंजना हिवराळे, मुजफ्फर अली युवक काँग्रेस, इरफान पठाण, अशोक दादा चक्रे, रेखा भिंगारदिवे, शांताबाई बनकर, विजया गायकवाड, भीमराव मोरे, नरेंद्र आटोटे, राहुल कांबळे, गणेश शिंदे, ऍड.संदीप आखाडे, प्रा.राजू शेगावकर, प्रा.प्रमोद धुळे, विलास जनबंधु इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
समाजकल्याण उपायुक्त पी.बी.वाबळे तसेच प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवळे यांनी आजच प्रलंबित प्रकरणे ज्यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांना आजच्या आज त्यांच्या खात्यावर स्वाधार ची रक्कम जमा होईल असे सांगितले बाकीची सर्व प्रकरणे दोन दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, महिलांच्या संदर्भात आजच महिला कर्मचाऱ्यांना कडक निर्देश देऊन विध्यार्थीनींचा त्रास थांबवण्याचे पत्र जरी केले.
१०, १२ च्या टक्केवारी च्या संदर्भात शासनाला प्रस्थाव कार्यालयामार्फत पाठवला जाईल असे सुद्धा अस्वासन यावेळी देण्यात आले.
No comments:
Post a Comment