तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 February 2023

तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन

जयवर्धन भोसीकर नांदेड  :

नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पंचशील बुद्ध विहार, तुप्पा येथे अनेक वर्षापासून जयंती साजरी होत असलेली याही वर्षी तुप्पा येथील महिला मंडळ यांच्या पुढाकारातून होत आहे.

माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त दिनांक 28 फेब्रुवारी मंगळवार या दिवशी विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील खडतर प्रवासा विषयी आणि त्यांनी केलेल्या त्यागा मुळेच भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घडू शकले आणि समाजाला त्याची जाणीव करून देण्यासाठी समाजासाठी त्यांचं किती मोलाचं योगदान राहिलेल आहे, यासाठीच या जयंती सोहळ्याच आयोजन करण्यात आलेल आहे.

तेव्हा सकाळी ठीक दहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन फारूक अहेमद राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी हे करणार आहेत पंचशील ध्वजाचे ध्वजारोह शिवा भाऊ नरंगले जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या हस्ते संपन्न होईल कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोविंद दळवी राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संघरत्न कुर्‍हे , प्रा. डॉ कविता सोनकांबळे उप प्राचार्य यशवंत महाविद्यालय नांदेड आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वर हत्ती अंभिरे पालमकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उत्तर, गंगाप्रसाद काकडे जि.प. सदस्य बळरामपूर, भुजंग गोडबोले पोलीस निरीक्षक नांदेड, श्याम भाऊ कांबळे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, विठ्ठल गायकवाड महानगर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, निरंजनाताई आवटे महिला जिल्हाध्यक्ष उत्तर ,रवी पंडित जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सपना खाडे महिला जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, प्रा. विनायक गजभारे तालुका अध्यक्ष नांदेड दक्षिण, केशव कांबळे जिल्हाध्यक्ष माथाडी कामगार, सुनील पवार मा. पंचायत समिती सदस्य, संतोष आगबोटे मा. महासचिव भारिप. सुदर्शन कांचनगिरे युवा नेते वंचित बहुजन आघाडी, साहेबराव पुंडगे सामाजिक कार्यकर्ता, सुभाष लोखंडे सामाजिक कार्यकर्ता, अड. के ए पंडित जिल्हा सत्र न्यायालय नांदेड. आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गावातील सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत सायंकाळी ठीक सहा वाजता समाज प्रबोधन पर गीताचा कार्यक्रम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार शाहीर शंकर सोनतोडे यांचा क्रांतीसुर्य ऑर्केस्ट्रा आणि संच नांदेड यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतीकुमार पंडित सुप्रसिद्ध निवेदक आणि गायक खीर दानाचा कार्यक्रम  रवी पंडित, सुरज पंडित, साहेबराव पंडित, राहुल डोईबळे, लक्ष्मण वाघमारे, प्रवीण डोईबळे यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी रमाई जयंती मंडळाचे अध्यक्ष छायाबाई भीमराव पंडित, उपाध्यक्ष सुजाता साहेबराव डोईबळे, सचिव शोभाबाई उत्तम डोईबळे, सहसचिव वनिता चंद्रकांत डोईबळे, सल्लागार धुरपतबाई मारुती पंडित, संघटक विद्या शिवाजी पंडित, विद्या रमेश पंडित हे सर्व जयंती मंडळ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तेव्हा या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आव्हान महिला मंडळ तुप्पा यांच्यासह रवि पंडित यांनी केल आहे.

No comments:

Post a Comment

Pages