पत्रकारिता विभागला आंतर विद्या शाखेअंतर्गत पी. एचडी साठी संशोधन मार्गदर्शक द्या : किशोर शितोळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 February 2023

पत्रकारिता विभागला आंतर विद्या शाखेअंतर्गत पी. एचडी साठी संशोधन मार्गदर्शक द्या : किशोर शितोळे

औरंगाबाद : 

डॉ्.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागातील विद्यार्थ्यांना एम. फील  ते पी.एचडी  अशी अधिछात्रावृत्ती सलग करण्यासाठी संशोधक मार्गदर्शक मिळत नसल्याने संशोधक विद्यार्थीचे मानसिक, शैक्षिणक नुकसान होत असल्याची अशी तक्रार  मा. कुलगुरू, मा. प्र कुलगुरू  मा.कुलसचिव, यांच्याकडे राज्यपाल नियुक्त माजी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे सर यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली.त्यात त्यांनी असे सांगितले की, सारथी , महाज्योती, बार्टी , मौलाना आझाद ,राजीव गांधी इत्यादी फेलोशिप घेणाऱ्या विद्यार्थांनी एम. फी ल पूर्ण केले आहे .सदर  फेलो शिप पी.एचडी साठी कायम राहणार आहे. परंतु जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागात पी. एचडी साठी संशोधक मार्गदर्शक उपलब्ध नाहीत.त्यामुळे २५ विद्यार्थी फेलो शिप  व  पी.एचडी पासून वंचित राहील...नाहीतर विद्यापीठ प्रशासनाने आंतर विद्या शाखे अंतर्गत संशोधक विद्यार्थांना पी.एचडी साठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावे.अशी मागणी राज्यपाल नियुक्त माजी व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे सरांनी विद्यापीठ प्रशासनाला केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages