दैनिक सम्राट चे संपादक बबन कांबळे यांना शंकरनगर येथे आदरांजली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 February 2023

दैनिक सम्राट चे संपादक बबन कांबळे यांना शंकरनगर येथे आदरांजली

बिलोली ,जयवर्धन भोसीकर:

    आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज, महाराष्ट्राची तोफ दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबनरावजी कांबळे यांचे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये पहाटे साडेसहाच्या दरम्यान दुःखद निधन झाले‌ हि दुःखद घटना समजताच शंकरनगर तालुका बिलोली येथे येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने दैनिक वृत्तरत्न सम्राट मुख्य संपादक बबनराव कांबळे यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यासाठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक निवृत्ती भागवत , प्राध्यापक डी आर माने, प्राध्यापक किसनराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

       यावेळी दै. प्रजावाणीचे मनोहर मोरे, शेषराव कंधारे, सत्तार इनामदार, हनमंत वाडेकर, अशोक पाटील जाधव, दैनिक वृत्तरत्न सम्राट चे भास्कर भेदेकर ,आनंदा डाकोरे, धम्मा भेदेकर, गंगाधर कांबळे, तानाजी शेळगावकर यासह अनेक पत्रकारासह माजी उपसरपंच संतोष पाटील पुयड, सुनील कांबळे, ब्रह्मानंद कांबळे, चंद्रकांत सोनकांबळे, मालू भंडारे, जयदीप कांबळे, जिगळा येथील उपसरपंच  नागसेन जिगळेकर, नागोराव कांबळे ,किशोर वाघमारे , मुनेश्वर सोनकांबळे, रावसाहेब जिगळेकर, मेकानिक लोहबंदे, समर्थ पाटील कानोले आधी सहअनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages