युवा परिवर्तन संस्थेचा 25 वा वर्धापन दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 February 2023

युवा परिवर्तन संस्थेचा 25 वा वर्धापन दिन साजरा

औरंगाबाद : येथील युवा परिवर्तन व्यावयायीक प्रशिक्षण केंद्र येथे संस्थेच्या 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोहन गाडेकर  होते.त्याचबरोबर रितेश शाक्य सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदशन करतांना संस्थेच्या कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.प्रमोद धुळे  यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, आज ज्या व्यक्तीमुळे आपणास कौशल्य प्राप्त करण्याची संधी मिळाली ती व्यक्ती म्हणजे बाळासाहेब खेर यांच्या विचारातून ही संकल्पना समोर आली आणि समाजातील तळागाळातील सर्व घटकातील लोकांना स्वयंम रोजगार निर्माण करून एक दुसरी संधी निर्माण करून देण्याचा काम त्यांनी केले आहे.आणि यातूनच असंख्य युवक युवती आज स्वःत च्या पायावर ठामपणे उभ्या आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी नवल  यांनी केले.आभार दीपाली सोनवणे तसेच सोनाली गाडेकर  यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवानी शेंदूरकर,ईशा कळकुंबे, हसीना मेश्राम, प्रज्ञा खेत्रे, प्रतिभा चव्हाण,निलिमा खाजेकर,प्रेरणा खाजेकर, उन्नती चव्हाण, शीतल लहाने,रोहिणी रगडे, रेणुका राऊत, साक्षी शिंदे, नेहा रत्नपारखे, नेहा कीर्तने, ज्ञानेश्वरी गवंडे, श्वेता वाकुर्डे व मयुरी पोले यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages