किनवट ,ता.१६ : सेक्युलर मुव्हमेंट व सेक्यूलर आर्ट मुव्हमेंटच्यावतीने संवैधानिक धार्मिक स्वातंत्र्य हक्क परिषद औरंगाबादमध्ये रविवारी (ता. १९) सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे होणार आहे, अशी माहिती सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष आणि राज्य समितीचे सदस्य अॅड.मिलिंद सर्पे यांनी दिली.
या परिषदेतच्या अध्यक्षस्थानी सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे हे राहतील. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शिवाजीराव शिंदे, कार्याध्यक्ष भरत शेळके, वंचित बहुजन आघाडीचे माजी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष महेश निनाळे, ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे मांडणी करतील. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित रहावे,असे आवाहन अॅड.मिलिंद सर्पे,नरेश माहूरकर,प्रा.विशाल गिम्मेकार, रामचंद्र देठे, सुनिल नेत्रगावकर आदिंनी केले आहे.
No comments:
Post a Comment