सर्वधर्मीय सामुहीक विवाह मेळाव्याचे 23 एप्रिल रोजी आयोजन ; नाव नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 February 2023

सर्वधर्मीय सामुहीक विवाह मेळाव्याचे 23 एप्रिल रोजी आयोजन ; नाव नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड  दि. 16 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या समन्वयाने नांदेड जिल्ह्यातील विश्वस्त संस्थेच्या सहकार्याने धर्मादाय संघटना सार्वजनिक सामुहीक विवाह सोहळा समिती नांदेड यांच्या पुढाकारातून सर्वधर्मीय सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा रविवार 23 एप्रिल 2023 रोजी शहीद बाबा दीपसिंघजी गुरुद्वारा, कौठा (विमान गुरुद्वारा) नांदेड येथे दुपारी 12.31 वाजता संपन्न होणार आहे. गरजुनी या सामुहिक विवाह सोहळयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त किशोर वसंतराव मसने यांनी केले आहे. 


सन 2018 प्रमाणे यावर्षी धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे निर्देशानुसार या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा विवाह सोहळा विनामूल्य होणार असून यामध्ये वधू-वरांना मणी, मंगळसुत्र, जोडवे, लग्नाचा ड्रेस व संसार उपयोगी साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी विशेषत: आत्महत्या शेतकरी, शहीद जवान, अपंग, निराधार व कोरोना काळात मृत्यू पावलेल्या कुटूंबातील वधू-वरांनी आपले नाव नोंदणी करुन या सर्वधर्मीय सार्वजनिक विवाह सोहळयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवाह सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


 

संपर्क व नाव नोंदविण्यासाठी धर्मादाय उप कार्यालय, नांदेड दू. क्र. 02462-249770, अध्यक्ष सुधाकर गोपीनाथ टाक मो.क्र.7588889000, सचिव मिनलताई निरंजन राव खतगावकर पाटील मो.क्र. 7507346600, कोषाध्यक्ष कामाजी गंगाधरराव पवार मो. क्र. 9158049999 व सदस्य शिवाजी राघोजीराव पवार मो.क्र. 8411999901 वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Pages