छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला - धमज्योती गजभिये ; बार्टी संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 20 February 2023

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला - धमज्योती गजभिये ; बार्टी संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

 पुणे :     छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. सूर्यप्रकाशाप्रमाणे त्यांचे कार्य स्वच्छ आहे, मावळ्यांची निष्ठा रयतेचे प्रेम हे महाराजांवर होते, महात्मा फुले यांनी छत्रपतींची समाधी शोधून काढली, फुले, शाहू, आंबडेकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांचे कार्य पुढे आणले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अठरापगड वंचितांना न्याय दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून लोकशाहीचा पाया उभा केला बार्टीने सारथी, महाज्योती या सारख्या संस्थेच्या उभारणीत मोठी मदत केली. असल्याचे प्रतिपादन बार्टी संस्थेचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बार्टी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.


          यावेळी विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, सत्येंद्रनाथ चव्हाण, रवींद्र कदम, श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक, लेखाधिकारी राजेन्द्र बरकडे, अजय कांबळे, शिव व्याख्याते रमेश बांडे, लहू लांडगे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, संभाजी ब्रिगेड संतोष पाबळे जिजाऊ उद्योग समूह पुणे, प्रवीण बोराडे , प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवंते, श्रीमती शुभांगी सुतार, महेश गवई डॉ. पायल डोके, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे, विकास गायकवाड, रवीकुमार आराक, विशाल शेवाळे, नसरिन तांबोळी डॉ. अंकुश गायकवाड आदी  यावेळी उपस्थित होते.

          

          यावेळी बोलताना डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण म्हणाले की विदेशातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिखाण केले म्हणून आम्हाला शिवराय समजले, शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही कोण्या एका जातीची धर्माची मक्तेदारी नाही. भीमराव ते बाबासाहेब या प्रवासामध्ये केळुसकर गुरुजी यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते, तसेच छत्रपती शाहू महाराज बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी त्याना शिक्षणासाठी व संशोधनासाठी मदत केली. महाराजांच्या महत्वाकांशी धोरणात्मक नाविन्यपूर्ण संशोधनामुळे भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास त्यांनी पूर्ण केला. भीमराव ते बाबासाहेब हा नवीन उप्रकम बार्टीमध्ये लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          प्रमुख वक्ते म्हणून बोलताना रमेश बांडे म्हणाले की, सामाजिक चळवळीचे काम बार्टी करत असून यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण बार्टी देत असते, बार्टीत बोलण्याची संधी मला दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

          छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अठरापगड जाती एकत्र येतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २७ डिसेंबर १९२७  साली  रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला असल्याचे  त्यांनी सांगितले.


          छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी नगर, पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विकास गायकवाड, रवीकुमार आराक रामदास लोखंडे आदी उपस्थित होते.

शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींची निवासी शाळा येरवडा पुणे येथील मुलींनी गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले.

सूत्रसंचालन डॉ. प्रेम हनवते यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश गोटे यांनी मानले.



No comments:

Post a Comment

Pages