संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आंजी येथे अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 February 2023

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आंजी येथे अभिवादन

किनवट. दि.18 (प्रतिनिधी) : जि.प.प्रा. शाळा आंजी येथे संत सेवालाल महाराज यांची 278 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुख्याध्यापक रवींद्र रमेशराव चौधरी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केल्यानंतर,सर्वांनी सादर अभिवादन केले.


       यानंतर मु.अ.रवींद्र चौधरी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यात श्री संत सेवालाल हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत  म्हणून ओळखले जातात. त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला.  जगण्यासाठी वणवण भटकंती करणार्‍या व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गात असणार्‍या बंजारा समाजाला उन्नतीकडे नेणारी दिशा दर्शविली. प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल याची शिकवण दिली. त्यामुळेच ते बंजारा समाजातील थोर समाज सुधारकही ठरलेत. यानंतर सह शिक्षक शशिकांत कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान शाळेतील कुमकुम जाधव, मयुरी जाधव, पल्लवी जाधव व तन्वी राठोड या मुलींनी बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा घालून लोकनृत्य सादर केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंह चायल, गोपाल कर्‍हाळे पाटील, रमेश जाधव, साहेबराव शेळके, भगवान कांबळे,अनिल जाधव, दयाराम जाधव, संतोष राठोड, परशुराम पवार, दिगंबर चव्हाण, गजानन डाखोरे, विनोद जाधव यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages