शाळांनी अवाजवी शुल्क आकारू नये- अनिल पाटील कऱ्हाळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 February 2023

शाळांनी अवाजवी शुल्क आकारू नये- अनिल पाटील कऱ्हाळे

किनवट,दि.18: दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीटसाठी पिडणाऱ्या तालुक्यातील शाळांविरुद्ध रा.कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील कऱ्हाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, लागू नसलेली फीस आकारून शाळांनी विद्यार्थ्यांचे नुकसान केले, तर त्याची किंमत या शाळांना मोजावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला आहे.


       कृउबा समितीचे माजी सभापती अनिल पाटील कऱ्हाळे यांनी म्हटले की, तालुक्यातील अनुदानित व शासकीय शाळा या  विद्यार्थ्यांकडून अवाजवी फीस आकारून विना पावती पैसे उकळीत आहेत. गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांनी या प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे असून, आदिवासी क्षेत्र असलेल्या या तालुक्यातील बंजारा, भटके आदी  नानाप्रकारचे गरीब नागरिक व शेतमजूर आपल्या मुलांची फीस भरूच शकतील असे नाही. केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे शेतकर्‍यांचा निघालेला कापूस,सोयाबीन घरातच पडून आहे. अशा आर्थिक अडचणीच्या वेळी शाळांकडून अवाजवी आर्थिक लूट केली जात असेल तर ते निंदनीय आहे. शासनाकडून अनुदान लाटूनही विद्यार्थ्यांना विनाकारण अडचणीत पकडणार्‍या या शाळांचे अनुदान बंद करण्यात यावे, अशा तक्रारी पालकांकडून येत असल्यामुळे या शाळांनी वेळीच सावध होऊन अवैध शुल्क आकारून विद्यार्थ्यांची कुचंबना करू नये. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages