किनवट शहरात तब्बल 8.77 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ ; आ.भीमराव केराम यांचे मतदारसंघाच्या विकासासाठी टोकाचे प्रयत्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 February 2023

किनवट शहरात तब्बल 8.77 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ ; आ.भीमराव केराम यांचे मतदारसंघाच्या विकासासाठी टोकाचे प्रयत्न

किनवट. दि.18 (प्रतिनिधी) :  किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांचा तालुक्यासह शहरामध्ये जनहिताची विविध विकासकामे करण्याचा धडाका सुरूच असून, महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने किनवट शहरातील नऊ प्रभागामध्ये तब्बल 8.77 कोटी रुपयांच्या विकास  कामांचा शुभारंभ शनिवारी (दि.18) आ.भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी दिली.


     वार्ड क्र. दोन मधील विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या पहिल्या आमदारकीच्या कार्यकाळातील कामाबद्दल बोलतांना आ. केराम म्हणाले की, सन 1993 मध्ये मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर  केवळ 18 महिन्याच्या लाभलेल्या काळात शहरात पाणी पुरवठा योजना सुरू करून प्रत्येक वार्डात पाणी पोहोचविले होते. लहान-सहान व्यापार्‍यांच्या गरजा लक्षात घेऊन मा.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने व्यापारी संकुल बांधून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. शहरातील सार्वजनिक उत्सव व इतर कार्यक्रमाकरिता मध्यवस्तीमध्ये हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा नावाने भव्य विचारमंच उभारून मोठे मैदान उपलब्ध करून दिले. आगीच्या घटनांवर उपाययोजनेसाठी अग्नीशमनाची व्यवस्था याच अल्प कार्यकाळात केली. बेरोजगार गरीबांना त्यांच्या इच्छेनुसार पालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून भरती केले. भारतीय स्टेट बँकेसाठी मोठी इमारत याच काळात बांधण्यात आली. गोर-गरीबांचे विवाह व इतर सोहळे माफक दरात व्हावेत म्हणून शहरात पालिकेची छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. दुर्गा मैदानात संत सेना महाराज सभागृहाची निर्मिती,  शहरातील सर्व प्रमुख मार्गावर पथदिवे, महात्मा फुलै चौकासमोरील दुभाजक रस्ता, वयोवृद्ध व बालकांसाठी संत गाडगेबाबा व स्व.उत्तमराव राठोड उद्यान ही सर्व विकासकामे याच अल्पकाळातील आहेत.


    दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शहराचा वाढता विस्तार पाहता वाढीव पाणीपुरवठा योजना राबविली. हु.गोंडराजे शंकरशहा विचारमंचचे नूतनीकरण व संरक्षक भिंतींसह सुशोभिकरण, सुभाषनगर टी पाईंट ते गोकुंदा शिव व गजानन महाराज मंदिर अंतर्गत भव्य रस्ताचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग ते घनकचरा  व्यवस्थापर्यंत रस्ता, रा.महामार्ग ते स्वामी समर्थ सभागृहापर्यंतचा रस्ता, स्थानिक आमदार निधी अंतर्गत  रस्ते बनविण्यात आले. अयप्पा स्वामी मंदिरातील पेवरब्लॉक, स्वामी विवेकानंद सभागृह, साईबाबा मंदिरामध्ये भाविकांसाठी स्वच्छतागृह, समतानगर येथील बौद्धविहार सभागृह, मार्कंडेय मंदिर सभागृह, द्वारकालॉज ते माहूर रोड पर्यंतचा रस्ता व गोपाल हॉटेल ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. दरम्यान, महाशिवरात्र व शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील तब्बल नऊ प्रभागामध्ये विविध विकासकामांचा शुभारंभास सुरूवात झालेली असून, प्रभाग क्रमांक दोन मधील अंतर्गत रस्त्यावर पहिल्यांदाच पेवरब्लॉक्स बसविण्याचा प्रयोग होणार असल्याची माहिती श्रीनिवास नेम्मानीवार यांनी आ.केराम, तहसीलदार तथा पालिका प्रशासक डॉ. मृणाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या शुभारंभ प्रसंगी सूत्रसंचालन करतांना दिली.  या विकास कामामुळे किनवट शहराचे एकूनच रुपडे पालटून तिच्या एकूण सौंदर्यात भर पडणार,अशी चर्चा नागरिकांत होती.

No comments:

Post a Comment

Pages