हिंगोली : जिल्ह्यातील डोनवाडा गावामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे मुख्य आकर्षण म्हणजे कॉम्रेड. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता' या शिवचरित्राचे सामूहिक वाचन हे होते.यामध्ये समस्त गावकरी आणि विशेषतः नवतरुणानी आपला सहभाग दर्शविला. तसेच वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेमध्ये एकूण पन्नास मुला-मुलींनी आपल्या वक्तृत्व कौशल्यातुन शिवाजी महाराजाच्या कार्याचे विविध पैलू सांगितले.
या स्पर्धेसाठी ग्रामीण कथाकार व कवी 'शिवदास पोटे सर' आणि कोरोना काळात ऑनलाईन क्लासेसद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाशी कायम जोडून ठेवण्याचे काम करणारे 'असोले सर' असे हे दोन्ही व्यक्तिमत्व परीक्षक म्हणून लाभले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुरुंदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष,पोलीस सहाय्यक निरीक्षक,'गजानन काळबा मोरे सर' यांनी कालच्या बंदोबस्ताची फार मोठी जबाबदारी असून सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित लावली व मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आपल्या गावातील प्रथम नागरिक, ज्योतीताई गायकवाड,बाजार कमिटीचे संचालक,उपसरपंच, रमेशराव दळवी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. तसेच गावाकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली खास करून महिला वर्गाने आणि मागच्या आठ दिवसांमध्ये अहोरात्र मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जिकरीचे काम केले. या सन्मानार्थ "शिवजन्मोत्सव समितीने " कौतुकाच्या भावना व्यक्त केल्या.
तसेच शिवजन्मोत्सव समितीने यापुढील कार्यक्रम असेच विचार पेरणारे कार्यक्रम करूयात अशी ग्वाही दिली .
No comments:
Post a Comment