अंबाडी येथे 22 रोजी बौद्ध मेळाव्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 February 2023

अंबाडी येथे 22 रोजी बौद्ध मेळाव्याचे आयोजन

 


किनवट: भारतीय बौद्ध महासभा शाखा अंबाडी ता.किनवट च्या वतीने दि.२२ फेब्रुवारी रोजी महान संत चिमणाजी महाराज यांची ८६ वि  पुण्यथिती तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध उपासक,उपसिकांनी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायांना उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या जाहीर पत्रकातून केले आहे

   दरवर्षी  ठिकाणी अंबाडी ता.किनवट येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते हमखास मराठवाडा,विदर्भ व तेलंगणा राज्यातून बौद्ध उपासक व उपसिका चिमणाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.

    पहिल्या सत्रात सकाळी ठीक साडे नऊ वाजता उपा.सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल दुसऱ्या सत्रात दुपारी चार ते सात यावेळेत भोजनदान होईल तिसऱ्या सत्रात सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूज्य भदंत कीर्ती आंनदबोधी नालंदा बुद्धविहार तळेगाव जि. रायगड, यांचे धम्मदेशना होईल. चौथ्या सत्रात सायंकाळी सात ते दहा या वेळत डॉ नागेश गवळी ,युवा व्याख्याते ,अहमदनगर फुले-शाहू आणि आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आजचा समाज याविषयी यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होईल. पाचव्या सत्रात रात्री दहा वाजेपासून महाराष्ट्रचे ख्यातनाम कव्वाल विकास राजा (आणि संच नागपूर) व प्रसिद्ध कव्वाला धम्मदीक्षा वाहुळे (आणि संच पुसद,जिल्हा यवतमाळ) यांचा दणदणीत बुद्ध-भीम गीतांचा मुकाबला होईल.असे दिवसभर भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

    कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी दि.२३फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष सतिष गिरीधर पाटील उपाध्यक्ष विशाल हलवले,सचिव अभय भवरे, सुरेन्द्र घुले,कपिल हलवले,उमेश भवरे,संजय भवरे,प्रेमानंद कानींदे, उल्हास फुसाटे, सुशील कानिंदे,रमेश हलवले, देविदास भवरे,राजहंस भवरे,राष्ट्रदीप कयापाक,अजय भगत,अमित भवरे, अशोक ठमके, दादाराव नगराळे, व एकनाथ कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा शाखा, रमाई महिला संघ व नवयुवक मिञ मंडळ शाखा अंबाडीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..

No comments:

Post a Comment

Pages