औरंगाबाद : दि.१६ रोजी थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खू च्या अभिवादनासाठी विमानतळावर ठेवण्यात आलेल्या बुद्ध मूर्तीला पाहून विमानतळावर राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही मूर्ती इथे कुणी ठेवली,तुम्हाला हेच काम आहे काय ? असे विधान करून उपस्थित बौद्ध नागरिकांच्या समोर हिणकस भावनेतून बौद्धांच्या धार्मिक भावना दुखवल्याने त्यांच्या वर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांच्या कडे करण्यात आली.
बौद्ध भिख्खूच्या स्वागतासाठी ह्या वेळी विमानतळावर मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित असल्याने समाजमाध्यमावर अंबादास दानवेंच्या ह्या कृत्याचा निषेध करण्यात येत असून अंबादास दानवे हे जाणीवपूर्वक असे करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील दानवे यांनी भीमकोरेगाव बंद च्या पार्श्वभूमीवर चिथावणी देणे,बौद्ध रिक्षाचालकास मारहाण,दुचाकीवरील अशोक चक्र पाहून तरुणांना मारहाण करणे,गाड्यांची मोडतोड करणे असे प्रकार करत असून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ते सतत असे करतात त्यामुळे त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज व ऑडिओ रेकॉर्डिंग तपासावी,प्रत्यक्ष दर्शींचे जवाब नोंदवावेत असे ही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी श्रावण गायकवाड, नानासाहेब शिंदे,अशोक गरुड,सतीश पट्टेकर,वसंत वक्ते,संतोष मोकळे,मिलिंद मोकळे,मोहनलाल गोरमे,सुनील खरात,राहुल वडमारे,सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,मनीष नरवडे,सुनील अंभोरे,राजू त्रिभुवन,प्रकाश घोरपडे,सचिन बागुल,बंटी सदाशिवे,योगेश वडमारे,सुमित सावंत,पुष्पानंद नितनवरे,संतोष त्रिभुवन,मनीष बोर्डे,फकिरचंद अवचरमल,अमोल बरथरे, पवन पवार,संदिप अहिरे ,अमोल भालेराव आदींची उपस्थिती होती.
आदींसह मोठ्यासंख्येने विविध आंबेडकरी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment